रंगारेड्डी (तेलंगाना) -मानव तस्करी विरोधी पथकाने दोन ठिकाणी छापा मारत १५ बालकामगारांची सुटका केली आहे. पथकाने शुक्रवारी ही कारवाई करत मुलांची सुटका केली. यात मुलं आणि मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी १ आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण फरार आहेत.
हयातनगरमधील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कंपनीत तसेच दारूच्या बाटल्याची सफाईचे काम लहान मुलांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी शिवा ट्रेडर्स, पवन पुत्र प्लास्टर कंपनी आणि लक्ष्मण प्लास्टर कंपनीवर छापा मारला. यात १५ बालकामगार आढळून आले.
पहिल्या कारवाईत पोलिसांनी शिवा ट्रेडर्सचा मालक चन्नाबाथिना रवी (वय ३०) याला अटक केली आहे. तर अन्य दोघे फरार आहेत. पोलिसांनी सांगितले की, आठ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलांना धोकादायक परिस्थितीत काम करण्यास भाग पाडण्यात आले.