कोटा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडनंतर आता राजस्थानच्या कोटा येथून शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांची मध्य प्रदेशमध्ये घरवापसी होत आहे. यासाठी 143 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरोना : राजस्थानच्या कोटामधून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था - buses parked outside kota city limits
विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे काम बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये सुरक्षित अंतर राखत मुलांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक बसमध्ये एक पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आला होता.
कोरोना
मध्यप्रदेशमधील विविध शहरे, जिल्ह्यांमधील जवळपास 4 हजार विद्यार्थी कोटाच्या शिकवणी वर्गांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे काम बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये सुरक्षित अंतर राखत मुलांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक बसमध्ये एक पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आला होता.