लखनौ- सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईच येथील एक १४ वर्षीय मुलगा 'पोलीस इन्चार्ज' बनला आहे. हातात काठी घेऊन लॉकडाऊन कसा पाळायचा याबाबत तो नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करू नका. घरातून बाहेर पडणे टाळा. सतत हात स्वच्छ धूत राहा. रुमाल किंवा मास्कचा वापर करा, अशा सूचना सातत्याने हा मुलगा देताना दिसत आहे.
१४ वर्षीय मुलगा बनला पोलीस; लॉकडाऊनचे नियम पाळण्याचा देतोय सल्ला - यूपी पोलीस
उत्तर प्रदेशच्या बहराईच येथील एक १४ वर्षीय मुलगा 'पोलीस इन्चार्ज' बनला आहे. हातात काठी घेऊन लॉकडाऊन कसा पाळायचा याबाबत तो नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे.
सौम्य अग्रवाल असे या मुलाचे नाव आहे. ' मी पोलिसांचा इन्चार्ज आहे. लॉकडाऊन कठोरपणे पाळा. कोणीही संचारबंदीचे उल्लंघन केले तर मी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुगांत डांबेन', असे सौम्य म्हणत आहे. सौम्य हा मीहिपूर्वा येथील रहिवासी आहे. सौम्यमधील नेतृत्वगुण पाहता पोलिसांनी त्याला आऊटपोस्ट इन्चार्ज बनवले आहे.
दरम्यान, बहराईचे येथील खासदार अक्षईबर लाल यांनीही सौम्यचे कौतुक केले आहे. यामुळे लोकांना लॉकडाऊनचे महत्त्व समजेल, असे ते म्हणाले. तसेच सौम्यलाही त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास त्याला पोलीस सेवा जॉईन करता येईल, असेही सांगितले आहे.