नागाव - आसाम राज्यातील नागाव येथील जियाजुरी चहा मळ्यामध्ये १४ फुट लांब किंग कोब्रा सापडल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. किंग कोब्राला पकडून यशस्वीरित्या जंगलात सोडण्यात आले आहे.
अबब..! चहाच्या मळ्यात सापडला तब्बल १४ फूट लांब किंग कोब्रा
किंग कोब्रा आढळल्याची बातमी पसरताच स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली होती.
चहाच्या मळ्यात सापडला १४ फूट लांब किंग कोब्रा
अत्यंत विषारी असलेला किंग कोब्रा मळ्यात काम करणाऱया कामगारांना दिसला. किंग कोब्रा आढळल्याची बातमी पसरताच स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली होती. स्थानिकांनी ही माहिती बिनोद दुलु या सर्पमित्राला दिली.
बिनोद घटनास्थळी धाव घेत किंग कोब्राचा शोध घेतला. त्याने १४ फुट लांबीच्या किंग कोब्राला यशस्वीरित्या पकडले. यानंतर, सुवांग येथील जंगलात त्याला सोडून देण्यात आले.