महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भूतानचे १३४ विद्यार्थी मायदेशी रवाना; लॉकडाऊनमुळे अडकले होते पंजाबमध्ये..

भूतानचे १३४ विद्यार्थी हे पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिवर्सिटी (एलपीयू) मध्ये अडकले होते. त्यांना भूतान सरकारने पाठवलेल्या एका विशेष विमानाने मायदेशी जाण्यास परवानगी देण्यात आली, अशा आशयाचे ट्विट सिंधू यांनी केले.

134 students stranded in Punjab amid lockdown leave for Bhutan
भूतानचे १३४ विद्यार्थी मायदेशी रवाना; लॉकडाऊनमुळे अडकले होते पंजाबमध्ये..

By

Published : Apr 13, 2020, 1:08 PM IST

चंदीगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे भूतानचे १३४ विद्यार्थी पंजाबमध्ये अडकले होते. सोमवारी त्यांना विशेष विमानाने मायदेशी पाठवण्यात आले.

राज्यांमधील कोरोनाच्या रुग्णांवर निगराणी करण्यासाठी नेमण्यात आलेले विशेष मुख्य सचिव के. बी. एस. सिंधू यांनी याबाबत माहिती दिली. भूतानचे १३४ विद्यार्थी हे पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिवर्सिटी (एलपीयू) मध्ये अडकले होते. त्यांना भूतान सरकारने पाठवलेल्या एका विशेष विमानाने मायदेशी जाण्यास परवानगी देण्यात आली, अशा आशयाचे ट्विट सिंधू यांनी केले.

दरम्यान, एलपीयूमधील एका मराठी विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी समजले. तर, राज्यातील विविध वसतीगृहांमध्ये देशभरातील २,४०० विद्यार्थी अडकले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १५१ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी ११ रुग्णांचा बळी गेला आहे. तर, राज्यातील ५ कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

हेही वाचा :लॉकडाऊन : हैदराबादमधील अवलिया तळीरामांसाठी ठरतोय 'देवदूत'.. वाटतो आहे 'पेग'

ABOUT THE AUTHOR

...view details