महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकातील १,३०० लोकांनी लावली होती मरकजला हजेरी; मुख्यमंत्र्यांची माहिती.. - कर्नाटक मरकज तबलिगी

या १,३०० तबलिगींमध्ये बंगळुरूतील २७६ लोकांचा समावेश होता. तर राज्यातील बाकी जिल्ह्यांमधून गेलेल्या ४८२ लोकांना शोधण्यातही सरकारला यश मिळाले आहे. यासोबतच बाकी ५४२ लोकांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली.

1,300 Tablighis from Karnataka attended Nizamuddin meet: Yediyurappa
कर्नाटकातील १,३०० लोकांनी लावली होती मरकजला हजेरी; मुख्यमंत्र्यांची माहिती..

By

Published : Apr 9, 2020, 1:35 PM IST

बंगळुरू - दिल्लीमध्ये पार पडलेल्या निझामुद्दीन मरकज कार्यक्रमाला राज्यातील तब्बल १,३०० लोकांनी हजेरी लावली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी ही माहिती दिली आहे.

या १,३०० तबलिगींमध्ये बंगळुरूतील २७६ लोकांचा समावेश होता. तर राज्यातील बाकी जिल्ह्यांमधून गेलेल्या ४८२ लोकांना शोधण्यातही सरकारला यश मिळाले आहे. यासोबतच बाकी ५४२ लोकांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली.

यामधील ५०० लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्यांपैकी ३० लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाकी ५४२ लोक जे देशभरात कुठेही असू शकतात, त्यांच्याबाबत राज्यांना माहिती देण्यात आली असून त्यानुसार त्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे येदीयुरप्पांनी सांगितले.

दरम्यान, राज्यामध्ये साठ विदेशी तबलिगींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांमद्धे इंडोनेशियाच्या २० नागरिकांसह बांगलादेश, ब्रिटन, फ्रान्स, गांबिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिकेतील तबलिगींचा समावेश आहे. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असले, तरी खबरदारी म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांपैकी काहींवर व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :ओडिशामधील लॉकडाऊन येत्या 30 एप्रिलपर्यंत वाढवले

ABOUT THE AUTHOR

...view details