महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शालीमार एक्स्प्रेसमधून 13 मुलांची सुटका ; मानवी तस्करीचा संशय - durag

हावडा येथून महाराष्ट्रात घेऊन जाणाऱ्या 13 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. दुर्ग रेल्वे स्थानकावर या मुलांना उतरवण्यात आले आहे. पोलिसांना मानवी तस्करीचा संशय आहे

शालीमार एक्स्प्रेसमधून 13 मुलांची सुटका

By

Published : Jun 29, 2019, 2:20 PM IST

भिलाई - हावडा येथून महाराष्ट्रात घेऊन जाणाऱ्या 13 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. दुर्ग रेल्वे स्थानकावर या मुलांना उतरवण्यात आले आहे. पोलिसांना मानवी तस्करीचा संशय आहे


महाराष्ट्रात नेल्या जाण्याऱ्या 13 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. RPF, GRP आणि स्टेशन मॅनेजरने एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. एक तरुण मुलांना ट्रेनमधून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संबधीत तरुणाला ताब्यात घेतले आहे.


शालीमार एक्सप्रेसमधुन मुलांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून दुर्ग रेल्वे स्थानकातील विश्राम गृहामध्ये ठेवण्यात आले आहे. मुले ही बिहारमधील राहणारी आहेत. दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्र पोलिसांनी 33 मुलांची राजनांदगाव येथे सुटका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details