डेहराडून - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यात 22 मार्चला संचारबंदी लागू झाल्यानंतर 23 मार्च पासून लगेच देशभरात लॉकडाऊन सुरू झाला होता. यामुळे शेकडोंच्या संख्येने परदेशी पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. काही प्रमाणात लॉकडाऊनदरम्यानही पर्यटकांना येथून बाहेर काढून त्यांच्या देशांत पोहोचवण्यात आले. मात्र, अजूनही 1 हजार 267 विदेशी पर्यटक राज्यातल्या वेगवेगळ्या भागात अडकले आहेत.
लॉकडाऊनमुळे 1 हजार 267 परदेशी पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले - foreign tourist in uttarakhand
पर्यटन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 81 देशांमधून आलेले एकूण 1 हजार 267 पर्यटक उत्तराखंडाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकले आहेत. रशियाच्या 140, अमेरिकेच्या 137, ब्रिटनच्या 87 पर्यटकांचा यात समावेश आहे. या पर्यटकांना त्यांच्या देशांमध्ये पोहोचवण्यासाठी संबंधित देशांच्या दूतावासांशी संपर्क साधला जात आहे.
पर्यटन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 81 देशांमधून आलेले एकूण 1 हजार 267 पर्यटक उत्तराखंडाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकले आहेत. यामध्ये सर्वाधिक पर्यटक रशियातून आलेले आहेत. रशियाच्या 140, अमेरिकेच्या 137, ब्रिटनच्या 87 पर्यटकांचा यात समावेश आहे. सर्वाधिक 741 पर्यटक पौडी जिल्ह्यात अडकले आहेत. दरम्यान पर्यटन विभाग या विदेशी पर्यटकांची सूचना संबंधित देशांच्या दूतावासांना देत आहे. यामुळे हे पर्यटक आपापल्या देशात परतू शकतील.
विदेशी पर्यटकांची संख्या-
देश | संख्या |
रशिया | 140 |
अमेरिका | 137 |
ब्रिटन | 87 |
फ्रान्स | 71 |
जर्मनी | 70 |
ऑस्ट्रेलिया | 58 |
चीन | 56 |
इस्रायल | 55 |
इटली | 50 |
कॅनाडा | 46 |
यूक्रेन | 32 |
स्पेन | 31 |