बंगळुरू - कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडला असून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचले असून लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने जीवाची पर्वा न करता रुग्णवाहिकेला अचूक रस्ता दाखवला. त्यामुळे राईचूर उपायुक्त शरत. बी यांनी त्याचा 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सत्कार केला आहे.
...म्हणून त्या 12 वर्षाच्या मुलाचा करण्यात आला सत्कार - परिस्थिती
कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडला असून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्यंकटेश हा रायचूर जिल्ह्यातील रिरेरायनकुंपी गावात राहतो. पूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिकेला रस्ता पार करता येत नव्हता. या वेळी त्याने पाण्याच्या वेगाची पर्वा न करता रुग्णवाहिकेला रस्ता पार करायला मदत केली आणि रुग्णवाहिकेमधील चिमुकल्यांचे जीव वाचवले. ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने कॅमेऱ्यात कैद केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कर्नाटकातील 22 जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. तसेच 200 गावांना पुरामुळे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. लोकांना जीवनावश्यक सुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे बनले आहे.