मुंबई- कोरोनासारख्या महामारीचे संकट देशावर ओढावले आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहेत. कोरोनासारख्या संकटादरम्यान एकीकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत. तर दुसरीकडे जम्मू काश्मिरच्या डोडा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या मुलाने सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यांवरती आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांना चहा दिला आहे.
लॉकडाऊनदरम्यान १२ वर्षीय मुलाची माणूसकी, सीआरपीएफच्या जवानांना दिला चहा - सीआरपीएफच्या जवानांना दिला चहा
१२ वर्षीय अरशद अली याने आपल्या घरातून चहा आणला आणि रस्त्यावर पहारा देणाऱ्या सीारपीएफच्या जवानांना चहा दिला. यावर प्रतिक्रिया देताना सीआरपीएफचे जवान अनिल म्हणाले, की इथले लोक आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांची ही वागणूक आम्हाला प्रेरित करणारी असल्याचे जवानाने म्हटले आहे.
लॉकडाऊनदरम्यान १२ वर्षीय मुलाची माणुसकी