महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महासमुंद येथे स्थलांतरित कामगारांना नेणाऱ्या बसचा अपघात, 12 जखमी - स्थलांतरित कामगारांच्या बसला अपघात

चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर प्रथमोपचार मिळाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बसने त्यांच्या इच्छित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. आपापल्या राज्यात परतताना मजुरांच्या वाहनांचे वारंवार अपघात होत असल्याच्या बातम्या मिळत आहेत.

मजुरांच्या बसला अपघात
मजुरांच्या बसला अपघात

By

Published : May 29, 2020, 11:50 AM IST

महासमुंद (छत्तीसगड) -मुंबईहून पश्चिम बंगालच्या मैत्रीपूरला कामगार आणि मजुरांना घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाला. यामध्ये 12 लोक जखमी झाले आहेत. यातील एकाचा पाय फॅक्चर झाला आहे. ही बस राष्ट्रीय महामार्ग 53 वर कुहरी आणि छछानच्या मध्ये पलटी झाल्याने हा अपघात घडला. बसमधून एकूण 26 प्रवासी प्रवास करत होते.

चालकाला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर प्रथमोपचार मिळाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बसने त्यांच्या इच्छित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. आपापल्या राज्यात परतताना मजुरांच्या वाहनांचे वारंवार अपघात होत असल्याच्या बातम्या मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी राजनांदगांव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details