शिमला- हिमाचलच्या कांग्रा खोऱ्यात 115 वर्षापुर्वी एक विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपामुळे कांग्राच्या आसपासच्या भागात विनाश झाला होता. या भूकंपामुळे हजारो जीव गेले होते. एका आकडेवारीनुसार सुमारे 20 हजार लोक या भूकंपात मरण पावले होते.
अवघ्या दोन मिनिटांच्या या भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले होते. भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी नोंदवली गेली होती. काही सेकंदांच्या या भूकंपामुळे बर्याच ऐतिहासिक इमारतींची नामशेष झाल्या.
असे म्हणतात की, त्यावेळी या भूकंपामुळे या भागात एकही घर शिल्लक राहिले नव्हते. 4 एप्रिल 1905 रोजी सकाळी सहाच्या सुमारास भूकंपाच्या दोन भूकंपाच्या धक्क्यानी कांग्राच नकाशाच बदलला. त्यावेळी कांग्राची लोकसंख्या खूपच कमी असूनही, हजारो लोक मरण पावले होते. त्यावेळी कांग्रा जालंधर विभागाचा भाग होता. कांग्राच्या मदतीसाठी लाहोर येथून मदत पाठवण्यात आली होती.