महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशी परतले; राज्यातील सहा नागरिकांचा समावेश.. - पाकिस्तानात अडकलेले ११४ भारतीय परतले

पाकिस्तानमध्ये अडकलेल्या ११४ भारतीयांना अटारी वाघा सीमेमार्फत मायदेशी आणण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या सर्व नागरिकांना लगेचच घरी न पाठवता, अमृतसरमधील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

पाकिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशी परतले; राज्यातील सहा नागरिकांचा समावेश..
पाकिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशी परतले; राज्यातील सहा नागरिकांचा समावेश..

By

Published : Jul 9, 2020, 7:50 PM IST

चंदीगड : पाकिस्तानमध्ये अडकलेल्या ११४ भारतीयांना अटारी वाघा सीमेमार्फत मायदेशी आणण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे नागरिक पाकिस्तानमध्येच अडकले होते. अखेर त्यांना परत आणण्यात आले आहे.

यामध्ये राजस्थानचे १६, जम्मू-काश्मीरचे ३४, दिल्लीचे १४, महाराष्ट्राचे सहा आणि पश्चिम बंगालचे तीन नागरिक आहेत. तसेच पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातचे प्रत्येकी दहा; मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एक; तर तेलंगाणा आणि बिहारच्या प्रत्येकी दोन नागरिकांचा समावेश आहे.

अमृतसरमध्ये करण्यात येणार क्वारंटाईन..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या सर्व नागरिकांना लगेचच घरी न पाठवता, अमृतसरमधील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा :भारतीय लष्करासाठी Truecaller अ‌ॅपची बंदी अन्यायकारण, कंपनीची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details