महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अहमदाबाद : सामूहिक विवाह सोहळ्यात 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध - Hindu and Muslim couples wedding in Gujarat

गुजरातमधील अहमदाबाद शहरात सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू आणि मुस्लीम समुदायाचे तब्बल 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

सामूहिक विवाह
सामूहिक विवाह

By

Published : Feb 9, 2020, 5:17 PM IST

अहमदाबाद -गुजरातमधील अहमदाबाद शहरात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात हिंदू आणि मुस्लीम समुदायाची तब्बल 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. एका सार्वजनिक संस्थेने या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.


गरीब परिवारांच्या मदतीसाठी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवविवाहीत जोडप्यांना भेट वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. 1 हजार 101 जोडप्यांचा भव्य विवाह सोहळा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. सामूहिक विवाह हा कुटुंबावरील आर्थिक ताण कमी करतो. ही एक चांगली प्रथा आहे. यातून वाचलेल्या पैशाचा उपयोग आपण इतर कार्यांसाठी करू शकतो, असे एका नवरदेवाने म्हटले. हा सोहळा हिंदू आणि मुस्लीम धर्मांमध्ये असलेल्या बंधुत्वाची साक्ष देणारा ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details