नवी दिल्ली - संबध भारतामध्ये 24 मार्चपासून 21 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सुमारे 11 हजार 500 फ्रेंच पर्यटक भारतात अ़डकून पडले आहेत. त्यामुळे फ्रान्सच्या भारतातील दुतावासाने पर्यटकांना माघारी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
CORONA : 11 हजार 500 फ्रेंच नागरिक कर्फ्यूत अडकले, मायदेशी जाण्याची धडपड सुरू - कोरोना लॉकडाऊन
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे परदेशी पर्यटकांची चांगलीच गोची झाली आहे. या कर्फ्यूमुळे जवळपास ११ हजार ५०० फ्रेंच पर्यटक भारतात अडकले आहेत.
'भारतात अडकलेल्या नागरिकांचे आम्हाला दरदिवशी तब्बल 500 फोन येत आहेत. सुमारे 11 हजार 500 पर्यटक येथे अडकून पडले आहेत. त्यातील 2 हजार पर्यटकांना फ्रान्स दुतावास माघारी घेवून जाण्यासाठी भारत सरकारबरोबर बोलणी करत आहे. एअर फ्रान्सच्या विशेष विमानाने सर्व पर्यटकांना माघारी घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे फ्रान्सच्या दुतावासाने म्हटले आहे'.
दरम्यान, भारताने तीन आठवड्यांची संचारबंदी लागू केल्यानंतर अनेक परदेशी पर्यटक आणि कामानिमित्त भारतात आलेले विदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकराने आंतरराष्ट्रीय उड्डानांसह देशांतर्गत विमान उड्डानेही रद्द केली आहेत. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा सहाशे सहा झाला आहे.