महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थान : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 120 वर - कोरोना

गुरुवारी तबलिगी जमातच्या 11 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राज्यात 27 कोरोनाग्रस्त रुग्ण नव्याने आढळले. त्यामुळे राजस्थानमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 120 पर्यंत वाढली आहे.

corona
कोरोना

By

Published : Apr 2, 2020, 12:07 PM IST

जयपुर - कोरोना विषाणूमुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक बनली असून गुरुवारी तबलिगी जमातच्या 11 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. तसेच गुरुवारी एकूण 27 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 120 वर पोहोचली आहे.

राजस्थानमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या 120 पर्यंत वाढली...

हेही वाचा...'अमेरिकन सैन्यांवर हल्ला केल्यास इराणला भारी किंमत मोजावी लागेल'

वैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तबलिगी जमातमधील एकूण 11 रुग्णांमध्ये कोरोना विषाणूच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. ज्यामध्ये 7 रूग्ण हे चूरू येथील आणि 4 रुग्ण टोंक येथील आहेत. यामुळेच राज्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनू लागली आहे. या व्यतिरिक्त गुरुवारी कोरोना विषाणूची लागण झालेले एकूण 27 रुग्ण नव्याने समोर आले आहेत. ज्यात एकट्या जयपूरमधील 13 जणांचा समावेश आहे.

हेही वाचा...पालघरमध्ये भूकंपाचा झटका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्राप्त माहितीनुसार, सवाई मानसिंग रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये दाखल झालेल्या अलवर येथील एका रुग्णाचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जयपूरमधील काही तबलिगी जमातच्या लोकांना जे दिल्ली येथे गेले होते, त्यांना आरयूएचएस रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर, वैद्यकीय विभागाने राज्यातील 6557 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, ज्यात 6289 नमुने नकारात्मक असल्याचे सांगितले आहे.

या व्यतिरिक्त, 21 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह वरुन निगेटिव्ह झाले आहेत. तर 11 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देखील देण्यात आली आहे. राज्यातील आकडेवारीबद्दल सांगायचे झाल्यास, भिलवारा येथील 26, झुंझुनू 8, जयपूर 34, पाली 1, प्रतापगड 2, सिकर 1, जोधपूर 8, इराणहून आलेले भारतीय 18, डूंगरपूर 3, चूरू 8, अजमेर 5, अलवर 2 आणि टोंकचे 4 असे रुग्णाचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details