महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये ट्रेलर-पिकअपचा भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू - राजस्थान ट्रेलर-पिकअप अपघात

राजस्थानातील शेरगड येथे झालेल्या ट्रेलर आणि पिकअपच्या धडकेत 11 लोकांचा मृत्यू झाला तर तीन लोक जखमी झाले. क्रेनच्या सहाय्याने वाहनांखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Representative Image
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Mar 14, 2020, 10:19 AM IST

Updated : Mar 14, 2020, 10:59 AM IST

जयपूर -जोधपूर जिल्ह्यातील शेरगड येथे झालेल्या ट्रेलर आणि पिकअपच्या धडकेत 11 लोकांचा मृत्यू झाला तर तीन लोक जखमी झाले. मृतांमध्ये 4 पुरुष, 6 महिला आणि एका मुलाचा समावेश असून सर्वजण बालोतराचे रहिवासी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ट्रेलर आणि पिकअपचा भीषण अपघात

क्रेनच्या सहाय्याने वाहनांखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोयींतरा गावाजवळ मेगा हायवेवर हा अपघात झाला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघाताबाबत ट्विटरवर शोक व्यक्त केला.

Last Updated : Mar 14, 2020, 10:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details