महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'अमेरिका- तालिबान शांतता करारानंतरही 10 हजारांपेक्षा जास्त सैनिकांवर हल्ले' - अफगाणिस्तान जवानांवर हल्ले तालिबान

9 फेब्रवारी 2020 ते 21 जुलै 2020 या काळात अफगाणिस्तानातील एएनडीएसएफच्या 10 हजा 708 जवानांवर हल्ले झाले. यामध्ये 3 हजार 560 जण शहीद झाले. 6 हजार 781 जण जखमी झाले असून इतर सैनिकांचे अपहरण करण्यात आले, असे घनी यांनी सांंगितले.

अश्रफ घनी
अश्रफ घनी

By

Published : Jul 29, 2020, 3:24 PM IST

काबूल - तालिबान आणि अमेरिकेमध्ये 29 फेब्रुवारीला शांतता करारावर सह्या झाल्यानंतरही अफगाणिस्तानातील सुरक्षा दलाच्या 10 हजार 708 जवानांवर ह्ल्ले झाल्याचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी मंगळवारी सांगितले. अफगाण नॅशनल सिक्युरिटी अ‌ॅन्ड डिफेन्स फोर्सेसच्या जवानांवर तालिब्यान्यांनी केलेल्या हल्ल्याची माहिती घनी यांनी दिली. सुरक्षा दलाचे 3 हजार 560 जवान मागील 4 महिन्यांच्या काळात शहीद झाल्याचे घनी म्हणाले.

29 फेब्रवारी 2020 ते 21 जुलै 2020 या काळात अफगाणिस्तानातील एएनडीएसएफच्या 10 हजा 708 जवानांवर हल्ले झाले. यामध्ये 3 हजार 560 जण शहीद झाले. 6 हजार 781 जण जखमी झाले असून इतर सैनिकांचे अपहरण करण्यात आले, असे घनी यांनी सांंगितले. या काळात 775 सर्वसामान्य नागरिकही मारले गेले. तर 1 हजार 609 जण जखमी झाले असून 689 जणांचे अपहरण करण्यात आले. या काळात तालिबान्यांकडून सतत रॉकेट हल्लेही करण्यात आल्याचे घनी यांनी सांगितले.

अमेरिका आणि तालिबान्यांमध्ये 29 फेब्रुवारीला कतारची राजधानी दोहा येथे शांतता करार झाला. त्यानंतर अमेरिेकने अफगाणिस्तानातील सैन्य कमी करण्याचे ठरले होते. मात्र, शांतात करार होऊनही अफगाणिस्तानातील परिस्थिती अस्थिर असल्याचे घनी यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details