नवी दिल्ली- भोपाळमध्ये बैठक झाल्यानंतर भाजपच्या आमदारांना दिल्लीला हलविण्यात आले होते. तेथून आता आमदारांना हरियाणातील गुरगाव येथे नेण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांच्यापाठोपाठ २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे.
मध्यप्रदेश सत्तापेच: भाजपच्या १०६ आमदारांना दिल्लीवरून गुरगावला हलविले
काँग्रेसचे नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांच्यापाठोपाठ २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे. आता भाजपचे सर्व आमदार हरिणातील गुरगाव येथे गेले आहेत.
भाजपचे आमदार मंगळवारी रात्रीच भोपाळच्या विमानतळावरुन दिल्लीसाठी रवाना झाले होते. 'आम्ही येथे सुट्टीसाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहे', असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गिय यांनी सांगितले होते. मात्र, राज्यातील सत्तापेचानंतर आमदारांना दिल्लीला नेण्यात आल्याने सगळीकडे चर्चा सुरू होती.
आता सर्व आमदारांना गुरगावला हलविण्यात आले आहे. अनेक आमदार आपल्यासोबत बॅग आणि पासपोर्टही घेवून आले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशातही कर्नाटक पॅर्टन सुरू झाल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे.