नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाणही वाढले आहे. तेलंगाणातील एका 103 वर्षीय आजोबाने कोरोनावर मात केली आहे.
तेलंगाणातील 103 वर्षीय आजोबांची यशस्वीरित्या कोरोनावर मात - तेलंगाणा कोरोना रुग्ण आकडेवारी
तेलंगाणातील एका 103 वर्षीय आजोबाने कोरोनावर मात केली आहे. पारुचुरी रामास्वामी असे 103 वर्षीय आजोबांचे नाव आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर पारुचुरी यांनी आनंद व्यक्त केला असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
पारुचुरी रामास्वामी असे 103 वर्षीय आजोबांचे नाव आहे. तेलंगणा वैद्यकीय विज्ञान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर पारुचुरी यांनी आनंद व्यक्त केला असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार 424 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 52 लाखांवर गेली आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 लाख 6 हजार 615 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 15 लाख, 72 हजार 343 एवढी झाली आहे.