गुवाहटी- आसाममध्ये जपानी तापामुळे (मेंदूज्वर) आत्तापर्यंत १०२ जणांचा बळी गेला आहे. आसाम मेडीकल कॉलेजचे प्रमुख हिरण्य कुमार गोस्वामी यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ साली ९२ लोकांनी जपानी तापामुळे प्राण गमावले होते. २०१७ साली ८७ तर २०१८ साली ९४ लोकांचा मृत्यू झाला होता.