जयपूर- संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अनेक जण देशासाठी फूल ना फूलाची पाकळी म्हणून मदत करत आहेत. असेच राजस्थानच्या कोटामधील एक 101 वर्षीय महिला कोरोनाच्या युद्धाला तोंड देण्यासाठी मदतीसाठी पुढे सरसावली आहे. लीलावती जैन असे या महिलेचे नाव आहे.
लीलावती जैन या महिलेनेही कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी आपल्या जमा झालेल्या पैशातून 1 लाख 6 हजार 101 रुपये निधी म्हणून दिले आहेत. या रकमेचा धनादेश कोटा शहर जिल्हाधिकारी आरडी मीणा यांच्याकडे देण्यात आला.