महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेश : गौशाळेमध्ये 100 गायी आढळल्या मृत अवस्थेत, विषबाधा झाल्याचा संशय

कोत्तुर जिल्ह्यातील तडेपल्ली गावात असलेल्या  एका गौशाळेमध्ये 100 गायी मृत अवस्थेमध्ये अढळल्या आहेत.

By

Published : Aug 10, 2019, 1:51 PM IST

विजयवाडा

विजयवाडा (आंध्र प्रदेश) - कोत्तुर जिल्ह्यातील तडेपल्ली गावात असलेल्या एका गौशाळेमध्ये 100 गायी मृतअवस्थेमध्ये अढळल्या आहेत. चाऱ्याच्या माध्यमातून विषबाधा झाल्याचा संशय गौ संरक्षण समितीचे सचिव साहू यांनी व्यक्त केला आहे.


तडेपल्ली गावातील ही गौशाळा विजयवाडा गौ संरक्षण समितीच्या अंतर्गत आहे. गायींची सामूहिक हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी खटला दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी गौशाळेमधील पाणी आणि चाऱ्याचे नमुने गोळा केले आहेत. आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळत आहोत, असे पोलीस उपनिरीक्षक ओमर यांनी सांगितले आहे.


गौशाळेमध्ये जवळपास 1,450 गायी आहेत. पशुवैद्यकीय सर्जन श्रीधर यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत गायींना शवविच्छेदनासाठी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापूर्वी गौशाळेमध्ये 24 गायींचा मृत्यू विषबाधामुळे झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details