नवी दिल्ली -येथे दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या नागरिकांना खासगी रुग्णालयात १० टक्के खाटांचे आरक्षण देण्याचा निर्णय दिल्ली शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या श्रेणी अंतर्गत आता कोरोना संसर्गाच्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे.
सोमवारी २५ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासगी रुग्णालयातील २ हजार खाटा या कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरता उपलब्ध करण्यात येतील, अशी घोषणा केली होती.
दिल्लीच्या ६१ खासगी रुग्णालयांमध्ये आधीपासूनच ईडब्ल्यूएस कोटांतर्गत दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या रुग्णांच्या उपचाराकरता १० टक्के खाटांचे आरक्षण देण्यात आले आहे. अशी माहिती ईडब्ल्यूएस निरीक्षण समितिचे सदस्य अशोक अगरवाल यांनी दिली.
या श्रेणींतर्गत येणाऱ्या नागरिकांना आता कोरोना संसर्गावर मोफत उपचार घेता येणार आहे. त्यांना रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या खाटानुसार ही सुविधा देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.