कानपूर - शहरात बुधवारी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. तर, घटनेतील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
'कोरोना वॉरियर्स'वर दगडफेक, दहा जणांना अटक
शहरात बुधवारी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. बुधवारी एका व्यक्तीला क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या टीमवर काही लोकांनी हल्ला केला. यानंतर पोलीस प्रशासनाने या भागात पैरामिलिट्री फोर्स आणि पीएसी तैनात केले.
'कोरोना वॉरियर्स'वर दगडफेक
बुधवारी एका व्यक्तीला क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या टीमवर काही लोकांनी हल्ला केला. यानंतर पोलीस प्रशासनाने या भागात पैरामिलिट्री फोर्स आणि पीएसी तैनात केले. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. आज व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी यातील 10 लोकांना अटक केली आहे. बाकी 30 ते 35 लोकांचा शोध सुरु आहे.