वझिरीस्तान (पाकिस्तान) -दहशतवाद्यांसोबत झालेल्या २ चकमकीमध्ये पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले आहेत. ही घटना उत्तर वझिरीस्तान आणि बलुचिस्तान या भागात घडली.
अफगाण सीमेजवळ दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत १० पाकिस्तानी सैनिक ठार - pakistan army killed
पहिल्या चकमकीमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ असलेल्या उत्तर वझिरीस्तान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाले तर, ४ सैनिक बलुचिस्तान भागातील चकमकीत ठार झाले आहेत.
पहिल्या चकमकीमध्ये अफगानिस्तान सीमेजवळ असलेल्या उत्तर वझिरीस्तान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाले तर, ४ सैनिक बलुचिस्तान भागातील चकमकीत ठार झाले आहेत.
"हुतात्मा झालेल्या १० सैनिकांनी आपल्या प्राणांचा आहुती देऊन पाकिस्तानमध्ये शांतता पसरवण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. येथील सीमा अधिक मजबूत करण्याकडे लक्ष देण्याच्या प्रयत्नातून आदिवासी भागातील सुरक्षिततेत सुधारणा करण्यात आली आहे." असे पाकिस्तान सैन्य दलाचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफ्फूर यांनी ट्वीट केले आहे.