नवी दिल्ली -कोरोना लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक दिल्लीमध्ये अडकून पडले आहेत. दिल्ली मध्ये राहणाऱ्या नागरिकांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचत असल्याची माहिती दिल्ली सरकार देत आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक आपल्या घरी जाऊ इच्छित आहेत. या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली सरकारने १० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
दिल्लीमध्ये अडकून पडलेल्या काही लोकांनी पायीच आपला घरचा रस्ता धरला होता, तर काही लोकांनी आनंद विहार येथे गर्दी केली होती. त्यानंतर दिल्ली सरकारने काही नागरिकांना त्यांच्या राज्यांच्या सीमांपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली तर काहींना दिल्लीतच थांबवून ठेवण्यात दिल्ली सरकारला यश आले.
मधुप व्यास हे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, केंद्रशासित प्रदेश जम्मू- काश्मीर, लद्दाख, दादर नगर हवेली, दीव-दमन येथील नागरिकांची जबाबदारी सांभाळतील तर निखिल कुमार यांच्याकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड देण्यात आले आहे.