नवी दिल्ली - देशातील १० ऐतिहासिक वारसास्थळांची सर्वसामान्यांसाठी सुरू राहण्याची वेळ 3 तासाने वाढवण्यात आली आहे. सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी 10 ऐतिहासिक वारसास्थळे खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रह्लाद पटेल यांनी ही माहिती दिली आहे.
देशातील 'ही' १० ऐतिहासिक वारसास्थळे रात्री 9 वाजेपर्यंत राहणार खुली
देशातील १० ऐतिहासिक वारसास्थळांची सर्वसामान्यांसाठी सुरू राहण्याची वेळ 3 तासाने वाढवण्यात आली आहे.
यामध्ये दिल्लीमधील हुमायूनची कबर, सफदरगंज मकबरा, भुवनेश्वरमधील राजा राणी मंदिर, खजुराहो येथील दुल्हादेव मंदिर, कुरुक्षेत्रातील शेख चिल्लीचा मकबरा, कर्नाटकातील पट्टडकल स्मारकर समूह, गोल गुमबाज, महाराष्ट्रातील गडचिरोलीमधील मार्कण्डेय मंदिरांचा समूह, उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील मान महल, गुजरातमधील राणीचा वाव यांचा समावेश आहे. दरम्यान वेळेतील बदल हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यापुर्वी ऐतिहासिक वारसास्थळांची खुली राहण्याची वेळ सांयकाळी 6 वाजेपर्यंत होती.
भारतातील काही ऐतिहासिक स्थळे युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी 'जागतिक वारसा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. युनेस्कोने जगातील २८ स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले असून यात महाराष्ट्रातील पाच स्थळांचा समावेश आहे.