नवी दिल्ली - देशभरामध्ये मागील 24 तासांत 1 हजार नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दैनंदिन पत्रकार परिषदेत दिली. सद्यस्थितीत आमचे सर्व प्रयत्न कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी सुरू आहेत. त्यासासाठी विविध तंत्रज्ञानांवर काम सुरू असल्याचे मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.
मागील 24 तासांत 1 हजार 7 नवे कोरोनाग्रस्त; तर 23 जणांचा मृत्यू - corona update
कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्यापासून कोरोनाचे रुग्ण 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचे आणि मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण 80:20 आहे - आरोग्य मंत्रालय
कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्यापासून कोरोनाचे रुग्ण 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आणि मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 80:20 आहे. हे प्रमाण इतर देशांपेक्षा खुप जास्त असल्याचे अगरवाल म्हणाले.
मे महिन्यापर्यंत स्वदेशी बनावटीची 10 लाख आरटीपीसीआर कीट बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य सचिवांनी सांगितले. देशभरामध्ये आत्तापर्यंत 13 हजार 387 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यातील 1 हजार 749 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 437 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 एप्रिलपर्यंतचा पहिला लॉकडाऊनचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आले आहे.