महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगभरात प्रत्येक सेंकदाला वापरल्या जातात 1.60 लाख प्लास्टिक पिशव्या! - प्लास्टिक जागतिक वापर

प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टायरोफोम या घटकाचे विघटन होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. त्या अगोदरच हा घटक पाणी, मातीचे प्रदुषण होण्यास कारणीभूत ठरतो. प्लास्टिक पिशव्यांमुळे वन्यप्राणी आणि समुद्री जीवांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येवर उपाय म्हणून 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिना'च्या दिवशी जगाला सिंगल युज प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.

Plastic Bag
प्लास्टिक पिशवी

By

Published : Jul 7, 2020, 5:23 PM IST

हैदराबाद - पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती एका वर्षात 700 प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग करतो. याचा सारासार विचार केला तर जगभरात प्रत्येक सेंकदाला 1.60 लाख प्लास्टिक पिशव्या म्हणजेच एका वर्षात 1 ते 5 ट्रिलियन पिशव्यांचा वापर होत आहे. यातील फक्त 1 ते 3 टक्के प्लास्टिकवर पुनर्रप्रक्रिया केली जाते.

प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टायरोफोम या घटकाचे विघटन होण्यासाठी हजोरो वर्षांचा कालावधी लागतो. त्या अगोदरच हा घटक पाणी, मातीचे प्रदुषण होण्यास कारणीभूत ठरतो. प्लास्टिक पिशव्यांमुळे वन्यप्राणी आणि समुद्री जीवांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येवर उपाय म्हणून 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिना'च्या दिवशी जगाला सिंगल युज प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.

का करू नये प्लास्टिक पिशव्यांचा वापर -

विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या सांडपाण्याच्या नाल्या आणि जलस्रोतांना मोठा अडथळा आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या नाल्यामध्ये अडकल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

1988 व 1998 मध्ये बांगलादेशात याच कारणाने पूर येऊन मोठी वित्त व जिवितहानी झाली होती. तेव्हा पासून तेथील सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

अनेक ठिकाणी नैसर्गिक जल स्रोतांमध्ये प्लास्टिक कचरा टाकला जातो. हा कचरा पाण्यातील मासे आणि इतर जलचरांच्या प्रजननास आणि वाढीस मारक ठरतो. कासव आणि डॉल्फिन मासे प्लास्टिक पिशव्यांना खाद्य म्हणून खातात. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या व्यतिरिक्त डासांची निर्मिती होऊन साथीच्या रोगांना आमंत्रणही मिळते.

प्लास्टिकमधील स्टायरोफोम घटकाचा अंश मानवी शरिरात गेल्यास कर्करोग, श्वसनाचे आजार आणि प्रजनन संस्थेवर परिणाम करतात.

जगभरातील प्लास्टिक वापर दृष्टिक्षेपात -

संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट(डब्लूआरआय)ने जगातील 192 देशांचे परिक्षण केले आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार 2018 पर्यंत 127 देशांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत काही ना काही उपाययोजना केल्या आहेत.

यातील काही देशांमध्ये प्लास्टिक वापराबाबत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तर फक्त 16 देशांमध्ये पुनर्रवापरायोग्य प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात.

फ्रान्स, भारत, इटली, मादागास्कर आणि इतर काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घातलेली नाही. या देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी आहे.

चीनमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आहे. मात्र, प्लास्टिकच्या निर्मीती आणि निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली नाही.

भारतातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशाला सिंगल युज प्लास्टिक मुक्त करण्याची घोषणा केली आहे.

देशात 1998 मध्ये सिक्किम राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आजपर्यंत या राज्यात प्लास्टिक बंदीचा नियम काटेकोरपणे पाळला जातो.

सध्या संपूर्ण देशात सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास अडचणी येत आहेत.

प्लास्टिक पिशव्यांवर घातलेल्या बंदीनंतर प्लास्टिकची अवैध वाहतूक आणि काळा बाजार या सारखे प्रकार समोर आले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी)ने राष्ट्रीय हरित लवादाला सांगितल्याप्रमाणे देशातील 18 राज्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मिर, केरळ आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यावर अंशत: बंदी आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कोरोना विषाणूचा प्रभाव -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला आहे. भाजीपाल्याची वाहतूक व विक्री, लॉकडाऊन काळात जेवणाचे वितरण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्लास्टिक वरदान म्हणून समोर आले आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत आहे. मात्र, तरीही सिंगल युज प्लास्टिवर बंदी कायम आहे. कारण काही महिन्यामध्ये लस निघाल्यानंतर कोरोना विषाणूचा नायनाट होऊ शकतो मात्र, प्लास्टिकचा नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावरती नियंत्रण ठेवणेच योग्य आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details