नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ तारखेला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची भारतामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्या स्वागताला किती नागरिक येणार याचा आकडा मात्र, ट्रम्प यांच्या भाषणातून सातत्त्याने वाढत आहे. आधी ५० ते ७० लाख नागरिक मोटेरा स्टेडियम आणि परिसरात जमतील असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र, आता त्यांनी त्यापेक्षाही जास्त नागरिक येणार असल्याचा दावा केला आहे.
नमस्ते ट्रम्प...! '६० लाख ते १ कोटी जनता भारतात माझं स्वागत करेल'
कोलोराडो येथे दिलेल्या भाषणात एक कोटी नागरिक स्वागतासाठी येणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. ही संख्या ६० लाख ते १ कोटीपर्यंत असू शकते असे ट्रम्प म्हणाले. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जमल्यावर लोकांना स्टेडियममध्ये जागा पुरणार नाही, त्यांना बाहेर उभे रहावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले.
कोलोराडो येथे दिलेल्या भाषणात एक कोटी नागरिक स्वागतासाठी येणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. ही संख्या ६० लाख ते १ कोटीपर्यंत असू शकते असे ट्रम्प म्हणाले. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जमल्यावर लोकांना स्टेडियममध्ये जागा पुरणार नाही, त्यांना बाहेर उभे रहावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेमध्ये मोदींच्या स्वागतासाठी झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात ५० हजार नागरिक जमले होते. अमेरिकेत होणाऱ्या रॅलीपेक्षा ही संख्या जास्त होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत भेटीवर येण्यापूर्वी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारत आमच्यावर अनेक वर्षांपासून जादा आयात शुल्क लादत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ते कोलोरॅडोमधील कार्यक्रमात बोलत होते. असे असले तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली. मोठा व्यापार करार अस्तित्वात येईल, असेही त्यांनी सांगितले.