भिलवाडा - राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याचे कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेला भिलवाडा पॅटर्न संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, येथील आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे २७ कोरोनाबाधितांपैकी २५ रुग्णांंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
देशात 'भिलवाडा पॅटर्न'ची चर्चा.. मात्र जिल्ह्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - भीलवाड़ा में कोरोना मरीज
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याचे कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेला भिलवाडा पॅटर्न संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.
CORONA
यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने याबाबीचा जल्लोष करण्यास सुरुवात केली. यानंतर लगेच एका कोरोनाबाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे एकजूट न होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भिलवाडामध्ये २७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला असून राहिलेल्या २५ रुग्णांचे अहवाल आज निगेटिव्ह आल्याची माहिती राजकीय मेडिकल कॉलेजचे प्रिंसिपल डॉक्टर राजन नंदा यांनी दिली आहे.