आज शेतकरी दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करणार
नवी दिल्ली - हजारो शेतकरी रविवारी दिल्ली-जयपूर महामार्ग रोखण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
शेतकरी आंदोलनाचा आज 18 वा दिवस ; १४ डिसेंबरला सर्व शेतकरी नेते उपोषणाला बसणार
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाचा आज 18 वा दिवस आहे. केंद्र सरकार सोबतच्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. १४ डिसेंबरला सर्व शेतकरी नेते उपोषणाला बसणार आहेत. सरकारसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, आधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राजस्थानचे भाजपा प्रभारी अरुण सिंह जयपूर दौर्यावर, संघटनात्मक बैठक घेतील
बिहारमध्ये आज शेतकरी परिषद
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप संपूर्ण बिहारमध्ये किसान संमेलन आयोजित करत आहे. ते १ डिसेंबरपासून सुरू होईल आणि २ डिसेंबरपर्यंत चालेल.
आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा
माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी आज १३ डिसेंबरला पार पडणार आहे. पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी परवानगी दिलेल्या श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह शुक्रवारी आळंदीत दाखल झाल्या आहेत.