महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा दिल्लीत! सोनिया गांधींसह हजारो कार्यकर्ते झाले सामील - Sonia Gandhi participates in Bharat Jodo Yatra

कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज शनिवार (दि. २४ डिसेंबर)रोजी सकाळी सकाळी फरिदाबादमार्गे बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली आहे. (Bharat Jodo Yatra) यादरम्यान, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी बदरपूर सीमेवर राहुल गांधी आणि प्रवाशांचे जोरदार स्वागत केले.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो दिल्लीत दाखल

By

Published : Dec 24, 2022, 11:19 AM IST

भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल

नई दिल्ली -ही यात्रा आता बदरपूर सीमेवरून दिल्लीत गेली आहे. त्यानंतर ती आश्रम चौक मार्गे लाल किल्ल्यावर जाईल. या प्रवासादरम्यान ते 23 किलोमीटरचे अंतर पार करतील. (Bharat Jodo Yatra has entered Delhi) दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या आज दिल्लीत 'भारत जोडो यात्रे'त सामील झाल्या आहेत. कन्याकुमारी येथून सप्टेंबरमध्ये ही यात्रा सुरू झाल्यानंतर सोनिया गांधी सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकमध्ये 'भारत जोडो यात्रे'मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

द्वेष दूर करण्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाचे स्वागत - भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे. मग ते नितीन गडकरी असोत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असोत, किंवा माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असोत. (Sonia Gandhi participates in Bharat Jodo Yatra) सर्वांचे या यात्रेत स्वागत आहे. भारताला एकसंध बनवण्यावर आणि द्वेष दूर करण्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाचे या प्रवासात सहभागी होण्यासाठी स्वागत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. तसेच, 26 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत 'हात से हाथ जोडो' मोहीम राबवण्यात येणार असून, भारत जोडोचा संदेश प्रत्येक बूथ आणि ब्लॉकपर्यंत पोहोचवला जाईल. भारत जोडो यात्रा ही निवडणूक यात्रा नसून विचारधारेवर आधारित यात्रा आहे असही रमेश म्हणाले आहेत.

9 दिवसांची विश्रांती - यात्रा दिल्लीत दाखल होताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी जालेले पाहायला मिळाले. हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहून पोलिसांनी ट्राफिकच्या काही सुचनाही दिल्या आहेत. बदरपूर सीमेवरून लाल किल्ल्यावर अवजड वाहतूक होण्याची शक्यता आहे. दिल्ली काँग्रेसच्या म्हणण्यानुसार ही यात्रा 23 किमी अंतर कापून आज दुपारी 4.30 वाजता लाल किल्ल्यावर संपेल. त्यानंतर 'भारत जोडो यात्रा' 9 दिवसांची विश्रांती घेणार आहे.

वाहतूक वळवली - दिल्ली पोलिसांनी लोकांना यात्रा मार्गापासून दूर जाणारा रस्ता किंवा बायपास वापरण्यास सांगितले आहे. तसेच, तुमच्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीने या. यात्रेमुळे बदरपूर फ्लायओव्हर, प्रल्हादपूर रेड लाईट, मेहरौली बदरपूर रोड, अपोलो फ्लायओव्हर, मथुरा रोड सीआरआरआय रेड लाईट, मथुरा रोड, मोदी मिल फ्लायओव्हर, आश्रम चौक या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अँड्र्यूज स्ट्रीट, कॅप्टन गौर मार्ग, लाजपत नगर फ्लायओव्हर, निजामुद्दीन फ्लायओव्हर, प्रगती मैदान बोगदा, आयपी फ्लायओव्हरच्या दिशेने, सुब्रमण्यम भारती मार्ग/झाकीर हुसेन मार्ग क्रॉसिंग, मथुरा रोड/शेरशाह रोड टी-पॉइंट, क्यू-पॉइंट, आर/वाहतूक जसवंत सिंग, मंडी हाऊस, विकास मार्ग (यमुना पुल/लक्ष्मी नगर शकरपूर साइड), मिंटो रोड रेड लाईट, गुरु नानक चौक, राजघाट चौक भागात वळवण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details