कोहिमा (नागालँड) :Bharat Jodo Nyaya Yatra : कोहिमा येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा पुढील प्रवासाला सुरू झाली. यावेळी राहुल गांधी यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यावेळी मोठ्या संख्यने नागरिक राहुल गांधे यांचे हार, फुल देऊन स्वागत केले. तसेच, राहुल गांधी यांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेली त्यांनी केंद्र सरकावर जोरदार जोरदार हल्ला चढवला. जयराम रमेश म्हणाले," ज्या मार्गे यात्रा जात आहे तो राष्ट्रीय महामार्ग 29 आहे. परंतु, त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खूप बोलतात. पण या रस्त्यावर फक्त खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे का, असा उलट प्रश्नही रमेश यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.
ते आम्ही येथे परत आणू : या भारत जोडो न्याय यात्रेचा हा 66 दिवसांचा बस आणि पायी प्रवास आहे. 100 लोकसभा मतदारसंघ आणि 15 राज्यांतील 337 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. यापूर्वी राहुल गांधींनी (सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023)या कालावधीत कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो यात्रा' काढली होती. यापूर्वी मणिपूरची राजधानी इंफाळजवळील थौबल येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले, "मणिपूरमध्ये जे दुःख आहे ते आम्हाला समजलं आहे. आम्ही वचन देतो की, येथे शांतता, प्रेम, एकतेसाठी हे राज्य ओळखले जाते. ते आम्ही येथे परत आणू" असही ते म्हणाले.
आठ महिन्यांपासून गप्प का ? : मणिपूरमध्ये आठ महिन्यांहून अधिक काळ मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस मणिपूरमधील परिस्थितीसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदींना जबाबदार धरत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "पंतप्रधान आठ महिन्यांपासून गप्प का आहेत? तासभरही ते इंफाळला आलेले नाहीत"