इंफाळ (मणिपूर) Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज (15 जानेवारी) दुसरा दिवस आहे. मणिपूरच्या इंफाळ पश्चिमेतून या यात्रेला आज पहाटे पुन्हा सुरू झाली. दरम्यान, ही यात्रा सेकमाई येथून सुरू होऊन कांगपोकपी, नंतर मणिपूरमधील सेनापती आणि रात्री नागालँड येथे थांबेल. दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून 6 हजार 713 किलोमीटर अंतर पार करून 20 मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, "भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता शिबिराच्या ठिकाणी सेवादलाने पारंपारिक ध्वजारोहणानं केली. मणिपूर पीसीसीचे अध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी ध्वजारोहण केले. ही यात्रा सेकमाई ते कांगपोकपी आणि नंतर मणिपूरमधील सेनापतीपर्यंत जाईल आणि शेवटी नागालँड येथे रात्री थांबेल.
- कॉंग्रेसच्या सोशल मीडिया प्रतिनिधी सुप्रिया श्रीनेट एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "न्यायासाठी आवाज उठवत प्रत्येक अन्यायाविरुद्ध सज्ज व्हा. आम्ही बेरोजगारी, महागाई, गरिबी, गुन्हेगारी, असुरक्षितता यावर एकजुटीनं तोडगा काढू."