हैदराबाद - कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लसीकरणाची मागणी खूप वाढली आहे. सध्या केवळ कोविडद्वारे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि आरोग्य कर्मचारी लस घेत आहेत. अनेक आरोग्य केंद्रावर कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यामुळे हैदराबादस्थित इंडिया बायोटेक इंटरनॅशनल 'कोवॅक्सिनचे उत्पादन वाढवण्यावर काम करत आहे.
रशियाची आरडीआयएफ जगभरातील विविध देशांमध्ये 'स्पुटनिक व्ही' लसीचा पुरवठा करण्यासाठी भारतासोबत उत्पादन करारावर स्वाक्षरी करीत आहे. त्याचप्रमाणे भारत बायोटेक देखील आपल्या लसीचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘भारत बायोटेक’ दिल्लीतील पॅनेशिया बायोटेक या स्थानिक कंपनीशी करार करत असल्याची माहिती आहे. जर दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला तर कोव्हॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेक तसेच पॅनासिया बायोटेकद्वारे केली जाईल. यामुळे भारत बायोटेकच्या लसांची उपलब्धता वाढेल.