हैदराबाद -कोव्हॅक्सिन ही स्वदेशी कोरोना लस विकसित करणाऱ्या भारत बायोटेकला सोमवारी तेलंगाणा सरकारने 2021 चा जेनोम व्हॅली एक्सलन्स पुरस्कार प्रदान केला. तेलंगाणाचे आयटी मंत्री के.टी. रामाराव यांनी आज भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला आणि जेएमडी सुचित्रा इल्ला यांना हा पुरस्कार प्रदान केला.
भारत बायोटेकला व्हॅली एक्सलन्स पुरस्कार प्रदान - जेनोम व्हॅली एक्सलन्स पुरस्कार
कोरोना लस विकसित करणाऱ्या भारत बायोटेकला सोमवारी तेलंगाणा सरकारने 2021 चा जेनोम व्हॅली एक्सलन्स पुरस्कार प्रदान केला. जीवशास्त्र क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. भारत बायोटेक ही जगातील एकमात्र लसनिर्माती कंपनी आहे जिच्याकडे जैव सुरक्षा स्तर-३ (बीएसएल३) उत्पादनाची सुविधा आहे.

जीवशास्त्र क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार बायोएशियाचा एक अविभाज्य भाग आहे. तेलंगाणा सरकारकडून दरवर्षी बायोटेक्नॉलॉजी आणि जीवन विज्ञान परिषदेत हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही. हा फार्मा आणि लाइफ सायन्स इकोसिस्टमला समर्पीत आहे, असे ते म्हणाले. तसेच देशातील सुमारे 65 टक्के लस हैदराबादमध्ये तयार केल्या जातात, असे त्यांनी सांगितले.
हैदराबाद ही जागतिक लसीकरणाची राजधानी बनली आहे. हैदराबादसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे मंत्री केटीआर म्हणाले. कोवाक्सिन भारत बायोटेक कंपनीने विकसित केली आहे. हैदराबादमध्ये फार्मा कंपन्यांचा विस्तार होत आहे. आम्ही सुलतानपूरमध्ये वैद्यकीय उपकरणांसाठी पार्कही बांधत आहोत. हैदराबादमध्ये फार्मा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही केटीआर यांनी सांगितले. भारत बायोटेक ही जगातील एकमात्र लसनिर्माती कंपनी आहे जिच्याकडे जैव सुरक्षा स्तर-३ (बीएसएल३) उत्पादनाची सुविधा आहे.