भोपाळ-रामचरित मानसनंतर आता मध्य प्रदेशातील महाविद्यालयांमध्येही भगवत गीतादेखील विद्यार्थ्यांना शिकविली ( Bhagvad Gita included in course ) जाणार आहे. मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भगवत गीता शिकवण्याची तयारी करण्यात येत आहे. भगवद्गीता अभ्यासक्रमात समाविष्ट करणे, हा अतिशय चांगला निर्णय आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत महाविद्यालयांमध्ये महाभारताचा अभ्यास यापूर्वीच समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय 131 प्रकारच्या नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून कार्यशाळा आयोजित ( Workshop organized in DAV ) - देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंदूर विभागातील विविध महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आगामी काळात शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, हेही सविस्तरपणे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना देशाचा गौरवशाली इतिहास कळणार - सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माता अहिल्या, राजा विक्रमादित्य, राजा भोज यांसारख्या महान व्यक्ती आणि वीरांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. आजच्या तरुण पिढीला या धार्मिक ग्रंथांचे महत्त्व कळणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केले. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळू शकेल. त्याचबरोबर उत्कृष्ट महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे मंत्री मोहन यादव यांनी सांगितले.