महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bhagwant Mann Oath Ceremony : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून 'आप'चे भगवंत मान यांनी शपथ घेतली

पंजाब विधानसभेत आप'ला बहुमत मिळाल्यानंतर आता भगवंत मान यांनी आज बुधवार (दि. 16 मार्च)रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत, AAP ने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकल्या. मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांचा 58,206 मतांनी पराभव केला आहे.

पंजाबचे मुख्यंत्री म्हणून आप'चे भगवंत मान यांनी शपथ घेतली
पंजाबचे मुख्यंत्री म्हणून आप'चे भगवंत मान यांनी शपथ घेतली

By

Published : Mar 16, 2022, 1:27 PM IST

Updated : Mar 16, 2022, 1:44 PM IST

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (AAP) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) आज बुधवार (दि. 16 मार्च)रोजी पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab CM) म्हणून शपथ घेतली. (Bhagwant Mann Sworn as Punjab CM) शहीद भगत सिंग यांचं गाव असलेल्या नवांशहर जिल्ह्यातील खटकर कला येथे भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा झाला. (Nawanshahr) शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमात व्यवस्था करण्यात आली होती. शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सुमारे 8,000 ते 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आली होती

भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी तीन लाखांहून अधिक लोक उपस्थित राहतील अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सुमारे 8,000 ते 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलीस अधिकारी, महानिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त केले गेले होते. दरम्यान, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

पंजाबचे मुख्यंत्री म्हणून आप'चे भगवंत मान यांचा आज शपथविधी

शपथविधीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष योजना

आरोग्य आपत्कालीन परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी सुमारे 30 रुग्णवाहिका आणि 12 प्रथमोपचार पथके देखील तैनात करण्यात आली होती. जिल्हा पोलिसांनी प्रवाशांसाठी आणि शपथविधी समारंभासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी मार्ग योजना देखील जारी केली होती. पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, पोलीस महासंचालक व्ही. के. भवरा आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव ए वेणू प्रसाद यांनीही सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला होता.

भगवंत मान यांनी खासदारकीचा राजीनामा दिला

पंजाबचे मुख्यंत्री म्हणून आप'चे भगवंत मान यांचा आज शपथविधी

भगवंत मान यांचा शपथविधी समारंभाअगोदर खटकर काॅलनचे ठिकाण सजले आहे. लोकसभेत संगरूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भगवंत मान यांनी सोमवारी सभापती ओम बिर्ला यांच्याकडे आपाला खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर, AAP नेत्याने राज्यातील लोकांना त्यांच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केले होते. दरम्यान, पुरुषांना 'बसंती' पगड्या आणि महिलांना त्याच रंगाचा 'दुपट्टा' घालण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रमात पिवळा कलर उठून दिसत होते.

मान यांचा चरणस्पर्श

भगवंत मान यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांचा चरणस्पर्श केला. पंजाबमध्ये आपचे केवळ 20 आमदार होते. मात्र, आपने चांगली कामगिरी केल्याने पंजाबच्या मतदारांनी आपला भरभरून मतदान केले. आपचे 92 आमदार पंजाबच्या लोकांनी निवडून दिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला केवळ 18, अकाली दल आघाडीला चार, भाजप आघाडीला दोन आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे.

AAP ने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकल्या

भगवंत मान यांची टेलिव्होटिंगद्वारे आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, AAP ने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकल्या. मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांचा 58,206 मतांनी पराभव केला आहे.

हेही वाचा -Chandrakant Patil Claim : किमान दहा मंत्र्यांना तरी राजीनामे दावे लागतील, चंद्रकांत पाटलांचा दावा

Last Updated : Mar 16, 2022, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details