हैदराबाद -लॉकडाऊनच्या या काळात (mobile-laptop) आणि गॅजेट्स (Gadgets) आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाइन क्लासेस (online classes) आता काळाची गरज बनली आहे. लहान मुले लॅपटॉप आणि मोबाईल द्वारे अभ्यास करत आहेत. कोरोनामुळे घरातून बाहेर जाण्यावरही बंदी आली आहे. यामुळे ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूणच, मोबाइल आणि गॅजेट्स यापासून मुलांना दूर ठेवणे मुश्कील आहे. मात्र, पालक त्यांच्या वापरावर लक्ष ठेऊ शकतात.
याबाबतीत दोन घटना समोर आल्या. एक घटना यूपीच्या गाजियाबाद येथील असून, 11 वर्षाच्या मुलीने आईवडिलांनी फोन देण्यास मनाई केल्याने असे काही केले की जे वाचून तुम्ही विचारात पडाल. त्या मुलीने आई वडिलांच्या व्हॉट्सअप नंबर वेब द्वारे लॅपटॉपवरून वापरले. आपल्याच वडिलांकडून 1 करोड रुपये मागितले. पोलीसांंच्या तपासानंतर मुलीने रागात येऊन हे पाऊल उचलल्याचे सांगितले. मुलीचे वडिल इंजिनियर आहेत. तिने वडिलांना धमकवण्यासाठी लॅपटॉप आणि इंटरनेट मेसेजिंगचा वापर केला.
ऑनलाइन गेममध्ये 40 हजार हरल्याने लावला गळफास
दुसरी घटना मध्य प्रदेश मधील छतरपुर येथील आहे. ऑनलाइन गेममध्ये 40 हजार रुपये हरवल्यावर 13 वर्षाच्या मुलाने फाशी लाऊन आत्महत्या केली. पोलीस अधिक्षक (डीएसपी) शशांक जैन यांनी सांगितले की, मुलाने बँक खात्यातून 40 हजार रुपये काढले. आणि 'फ्री फायर' गेममध्ये हारला. त्याने आईला माऱी मागितील आहे. तोपुढे लिहीतो की, याच कारणामुळे मी आत्महत्या करत आहे. मुलाची आई दवाखान्यात नर्स आहे. त्याच्या मोबाईलवर मेसेज आल्यावर आईवडिल ओरडतील या भितीने हा पाऊल उचलले. याआधी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशच्या के सागर जिले में भी एक पिता ने 'फ्री फायर' गेम की लत के कारण अपने बेटे से मोबाइल फोन छीन लिया तो 12 वर्षीय छात्र ने कथित तौर पर फांसी लगा ली थी.