महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 16, 2022, 10:29 PM IST

ETV Bharat / bharat

Betul Murder Case : अवघ्या 300 रुपयांसाठी केली मोठ्या भावाने लहान भावाची हत्या

मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये 300 रुपयांच्या व्यवहारावरून दोन भावांमध्ये वाद झाला. (betul murder case). वादाचे रुपांतर मारामारीत झाले व त्यात मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. (elder brother kill younger brother). पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. (elder brother kill younger brother for 300 rupees).

Betul Murder Case
Betul Murder Case

300 रुपयांसाठी केली मोठ्या भावाने लहान भावाची हत्या

बैतुल (मध्य प्रदेश) : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुप्पा गावात मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. (elder brother kill younger brother). 36 वर्षीय सुमन सिंह काकोडिया आणि त्याचा मोठा भाऊ रमेश काकोडिया यांच्यात पैशांवरून वाद झाला. वादानंतर मोठा भाऊ रमेश याने लहान भाऊ सुमनच्या डोक्यात पाईपने वार केले. या हल्ल्यात धाकटा भाऊ सुमन सिंह ठार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (betul murder case).

300 रुपयांवरून वाद :सुमन काकोडियाने त्याच्या मेहुणीकडून 300 रुपये उसने घेतले होते. यावरून तिचा मोठा भाऊ रमेश सोबत त्याचा वाद झाला. या दरम्यान झालेल्या मारामारीत सुमनचा मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी रमेश फरार झाला, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आहे. व शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

पोलीस तपासात गुंतले :हत्येबाबत मृतकाचा दुसरा भाऊ श्याम म्हणतो, "दोघेही दारूच्या नशेत होते. दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला आणि मोठ्या भावाने लहान्याच्या डोक्यावर पाईपने वार केले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला". या प्रकरणी टीआय कोतवाली अपला सिंग सांगतात, "दोन भावांमध्ये 300 रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाला आणि डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे".

ABOUT THE AUTHOR

...view details