बैतुल -मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यामध्ये मुली आणि महिलांसमोर अश्लील कृत्य करणाऱ्यास दोन गावकऱ्यांनी एका मध्यमवयीन व्यक्तीला पेटवून ( Man Privates Parts set on Fire ) दिले. ही घटना बैतूल जिल्ह्यातील बिजादेही पोलीस स्टेशन हद्दीतील काजली गावातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गावकऱ्यांना अटक ( Two Men Arrested ) केली आहे. ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
पेट्रोल टाकून आग - तरुणी व महिलांसमोर नग्न होऊन अश्लील कृत्य करणाऱ्या या व्यक्तीवर गावकरी संतप्त झाले. शनिवारी दोन गावकऱ्यांनी त्याची पॅन्ट जबरदस्तीने काढून त्याच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यात तो गंभीर भाजला. गंभीर भाजलेल्या या व्यक्तीला चिचोली येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.