महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bet Of Eating Momos : पैज जिंकण्यासाठी खाल्ले 150 मोमोज,!...मात्र त्यानंतर गेला जीव - बिहारमध्ये 150 मोमोज खाल्ल्याने मृत्यू

मोमोज खाल्ल्याने कोणाचा मृत्यू होऊ शकतो का? हा प्रश्न यासाठी कारण बिहारमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने मोमोजचे अतिसेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Bet Of Eating Momos
मोमोजच्या अतिसेवनाने मृत्यू

By

Published : Jul 15, 2023, 4:28 PM IST

गोपालगंज (बिहार) : बिहारममधील गोपालगंजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोपालगंज आणि सिवान जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ग्यानी मोरजवळ रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह आढळून आला. मोमोजचे अतिसेवन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मोमोजने घेतला जीव : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाने मित्रांसोबत मोमोज खाण्याची शर्यत लावली होती. त्यावेळी त्याने तब्बल 150 मोमोज खाल्ले. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र मृत तरुणाच्या वडिलांनी हे खरे नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या मुलाची विष देऊन हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली आहे. विपिन कुमार असे या 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो सिहोरवा गावातील रहिवासी आहे.

वडिलांनी व्यक्त केली हत्येची भीती : मृत विपिन कुमार हा व्यवसायाने मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा. त्याचे सिवान जिल्ह्यातील बधरिया पोलीस स्टेशन परिसरात स्वत:चे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, तो त्यादिवशी नेहमीप्रमाणे दुकानात काम करत होता. तेव्हा दोन अनोळखी तरुणांनी त्याला फोन केला आणि त्याला दुकानातून घेऊन गेले. त्यानंतर तो परत आलाच नाही, असे त्याचे वडील म्हणाले.

उपचारादरम्यान मृत्यू झाला : या प्रकरणी पोलrस स्टेशन प्रमुख शशी रंजन म्हणाले की, मृत तरुणाने मित्रांसोबत पैज लावली होती. या पैजेच्या नादात त्याने 150 मोमो खाल्ले होते. मात्र मोमोज खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली. त्यानंतर त्याला सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. सध्या तरी अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण समजेल.

हे ही वाचा :

  1. Extortion Case Buldana: खंडणी मागण्यासाठी यू-ट्यूबवरून शोधून काढली युक्ती नातेवाईकच निघाला खंडणीबाज
  2. Pune Crime News: अनोळखी व्यक्तीला मदत करताय...तर सावधान! आजारपणाचे ढोंग करून 18 मुलींचा विनयभंग, आरोपीला अटक
  3. Solapur Crime News: पालकांनो सावधान! मुलांवर ठेवा लक्ष, दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मित्राकडूनच उकळली १० लाख रुपयांची खंडणी

ABOUT THE AUTHOR

...view details