बेंगळुरू ( कर्नाटक ) : कर्नाटकातील दोन विद्यार्थ्यांनी रुग्णालयांच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण मॉडेल्स तयार करण्यासाठी त्यांच्या कोडिंग पॉवरचा वापर केला आहे. कोविड दरम्यान होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेऊन हे मॉडेल खास तयार करण्यात आले आहे. ज्या दोन मुलांनी हे मॉडेल तयार केले त्यात हर्षवर्धन हा बेंगळुरूमधील गीतांजली विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी आहे. तर निरंत बी हा फ्रीडम इंटरनॅशनल स्कूलचा चौथीचा विद्यार्थी ( Bengaluru Student Coding Power ) आहे.
ही दोन्ही मुले एसपी रोबोटिक वर्क्सचा भाग आहेत. दोघांनी वैद्यकीय कार्ट एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेण्यासाठी वैद्यकीय सहाय्यक ट्रान्सपोर्टरसह आपत्कालीन वापरासाठी वाहतूक व्यवस्था विकसित केली आहे. हर्षवर्धन याने मेडिकल सपोर्टेड ट्रान्सपोर्ट रोबोट तयार केला आहे. ज्यामध्ये आवश्यक कामे करण्यासाठी त्यांनी रोबोटचे कोडिंग केले आहे. अशाप्रकारे रोबोट नर्सकडेच राहणार असून, त्यांना दुसऱ्या कर्मचाऱ्याची गरज भासणार नाही.
हर्षवर्धन म्हणाला, 'मी हा प्रकल्प निवडला. कारण गेल्या दोन वर्षांत मी जवळपास प्रत्येक रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून आली. यामुळे मला एक रोबोट बनवायचा होता जो डॉक्टर आणि परिचारिकांना मदत करेल. रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याच्या गाड्या ओढण्यात आणि ढकलण्यात त्यांनी वेळ वाया घालवावा असे मला वाटत नाही. परिणामी, मी एक सहायक ट्रान्सपोर्टर तयार केला आहे. जो आपोआप हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना मदत करेल.