बेंगळुरू (कर्नाटक) :बंगळुरूमध्ये किकबॉक्सिंग ( kickboxing Bengaluru ) खेळताना प्रतिस्पर्ध्याने दिलेल्या पंचामुळे रिंगमध्ये म्हैसूरच्या बॉक्सरचा मृत्यू झाल्याची ( Young Boxer dies after collapsing to opponent punch ) घटना घडली आहे. ही घटना रविवारी घडली असून उशिरा उघडकीस आली. 23 वर्षीय निखिल हा तरुण किकबॉक्सर होता ज्याचा मृत्यू झाला.
पहिल्याच पंचमध्ये गंभीर दुखापत - मूळचा म्हैसूरचा असलेल्या निखिलने तीन दिवसांपूर्वी (रविवार) बेंगळुरूच्या नगरभवी येथील रॅपिड फिटनेस येथे आयोजित राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला होता. रिंगणात असताना प्रतिस्पर्ध्याने दिलेल्या पंचामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो खाली पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला.