महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

INDIA VS NDA : 'दम असेल तर INDIA ला चॅलेंज करा!', विरोधी पक्षाच्या बैठकीनंतर कोण काय बोललं जाणून घ्या..

बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरवण्यात आले आहे. विरोधकांची आघाडी आता INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) या नावाने ओळखली जाणार आहे.

Bengaluru opposition meeting
बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक

By

Published : Jul 18, 2023, 5:08 PM IST

Updated : Jul 18, 2023, 5:23 PM IST

बेंगळुरू :बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत आघाडीतील नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. बैठकीला 26 पक्षांचे नेते उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे : पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'बैठकीत आम्ही विविध मुद्यांवर चर्चा केली. आम्ही आधी 'यूपीए' नावाने लढलो. आता आमच्या आघाडीचे नाव INDIA असणार आहे. या नावावर सर्वांची सहमत झाली आहे'. ते पुढे म्हणाले की, 'विरोधकांची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. त्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत'.

मोदी विरोधीपक्षांना घाबरत आहेत : खरगे पुढे म्हणाले की, भाजप ईडी, सीबीआयच्या नावाने धमकावत आहे. पाटण्यातील बैठकीत 16 पक्ष आले होते. आज 26 पक्ष एकत्र आले. आमचं पाहून आता मोदी 30 पार्टींना एकत्र बोलवत आहेत. मोदीदेखील आता विरोधी पक्षांना घाबरत आहेत, असे ते म्हणाले. खरगे म्हणाले की, आमचे उद्दीष्ट आहे की आम्ही देशभरात जाऊन जनतेला सरकारचे अपयश सांगणार आहोत.

ममता बॅनर्जी :बैठकीनंतर बोलताना पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की,आजपासून आमच्या लढ्याला सुरुवात झाली आहे. एनडीए इंडियाला चॅलेंज करू शकणार का?, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तुम्ही देशाचे मालक नाहीत. कोणात दम असले तर आम्हाला चॅलेंज करा. भाजप देश विकण्याचा सौदा करतो आहे. लोकशाहीला विकण्याचा सौदा करतो आहे, असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला.

उद्धव ठाकरे :यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,हुकुमशाहीच्या विरोधात जनता एकत्र येत आहेत. आम्ही वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत. आमची लढाई फक्त पार्टीची नाही. देश आमचा परिवार आहे. आम्हाला परिवाराला वाचवायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जशी एकेकाळी स्वातंत्र्याची लढाई झाली, तशी ही लढाई आहे. एक व्यक्ती, एक पार्टी म्हणजे देश नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

राहुल गांधी :राहुल गांधी म्हणाले की,आमचीलढाई भाजपच्या विचारधारेविरोधात आहे. ते देशावर आक्रमण करत आहेत. देशाचा पैसा काही ठराविक लोकांच्या हातात जातो आहे. देशाच्या आवाजाला दाबलं जात आहे, असे ते म्हणाले. भाजपविरुद्ध लढण्यासाठी आम्ही एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा :

  1. NDA Meeting : यूपीए विरोधात काय आहे भाजपचा 'काउंटर प्लॅन'? विरोधकांच्या ऐक्याला असे देणार आव्हान
Last Updated : Jul 18, 2023, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details