बंगळूर - कर्नाटकातील बंगळूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 34 वर्षीय व्यक्तीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करताना अटक केली आहे. या आरोपीने अनेक गायींसोबत असे अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. हा आरोपी येथील एका विद्यालयाच्या परिसरात झाडांच्या मागे जात गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. पोलिसांना या आरोपीला अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली ( Man arrested for unnatural sex with cows ) आहे.
मंजूनाथ असे या आरोपीचे नाव आहे. तो मांड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलागेरे गावातील रहिवासी आहेत. मंजूनाथच्या मित्राने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो बंगळूरमधील एका विद्यालयाच्या मैदानात जात. तेथे चरायला येणाऱ्या गायींना झाडांच्या मागे नेत अनैसर्गिक कृत्य करायचा.