महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Crime News : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून प्रेयसीवर केला चाकूने हल्ला, तरुणास अटक

बेंगळुरू शहरात एका महिलेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे तिच्या प्रियकराने तिच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Karnataka Crime News
बेंगळुरू येथे प्रेयसीवर चाकूने हल्ला

By

Published : Mar 1, 2023, 1:32 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : बेंगळुरू येथे राहणाऱ्या एका महिलेवर काल तिच्या प्रियकराने 15 हून अधिक वेळा वार केले. लीला पवित्रा नीलमणी असे त्या महिलेचे नाव असून ती आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील रहिवासी आहे. या महिलेने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर आरोपी दिनकर बनाला याने तिच्यावर हल्ला केला. बेंगळुरू शहराच्या पूर्व विभागाच्या डीसीपींनी याबाबत माहिती दिली आहे.

कुटुंबीयांनी संमती दिली नाही : पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांच्या म्हणण्यानुसार, जातीच्या कारणावरून लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाला संमती दिली नाही. लीला पवित्रा यांनी तिच्या प्रियकराला याची माहिती दिली तेव्हा तो संतापला. त्यानंतर महिलेने त्याच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. एकदिवशी त्याने तिला पकडले आणि तिच्यावर चाकूने अनेक वार केले. या हल्यात महिलेला अनेक जखमा झाल्या. ही महिला काम करत असलेल्या कार्यालयासमोरच ही घटना घडली.

आरोपीला अटक : गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या कार्यालयासमोर हा निर्घृण हल्ला झाल्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी या बाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. चाकूने अनेक वार केल्याने रक्तस्त्राव झालेल्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील मुलींच्या पालकांना ही माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. महिला ज्या कार्यालयात काम करत होती त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली आहे.

बेंगळुरू येथे तरुणीची आत्महत्या : बेंगळुरू येथे एका अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली आहे. मृत तरुणी ही शहरातील संजय नगर येथील रहिवासी आहे. बिल्डींगवरून खाली पडून शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. मुलीचे वय 16 - 18 दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलीच्या आई तेजू कौशिक ह्या गृहिणी आहेत. तर तिचे वडील अरविंद हे एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिने तिचे कुटुंब ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या अपार्टमेंमध्ये आत्महत्या केली नाही. मुलीने चालुक्य सर्कल येथील एचपी अपार्टमेंटच्या 10 व्या मजल्यावरून खाली पार्क केलेल्या एका कारवर उडी मारली. या तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. शहराच्या हाय ग्राऊंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :Mumbai Crime News: नूडल्सचे आमिष दाखवून केले तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; 42 वर्षीय शेजाऱ्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details