बेंगळुरू Girl Wrote 4 Books : साहित्यात रस असलेल्या बेंगळुरूच्या एका १६ वर्षांच्या विद्यार्थीनीनं चक्क चार पुस्तकं लिहिली आहेत. अमाना जे कुमार असं तिचं नाव असून तिनं आतापर्यंत इंग्रजी आणि हिंदीमध्ये ५०० हून अधिक कविताही लिहिल्या आहेत.
सहाव्या वर्गात असताना लिखाणास सुरुवात : डॉ लता टीएस आणि केएसआरटीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जयवंत कुमार यांची मुलगी अमाना हिनं सहाव्या वर्गात असताना इंग्रजी कविता लिहिण्यास सुरुवात केली. तिनं 'इकोज ऑफ सोलफुल पोयम्स' या नावानं तिचा पहिला कविता संग्रह लिहिला. त्यानंतर तिनं 'वर्ल्ड अमिड्ट द वर्ड्स' आणि 'लफ्जो की महफिल' हे दोन कविता संग्रह लिहिले. हिंदी कवितांचा तिसरा संग्रह ई-प्लॅटफॉर्म आणि इतर ठिकाणी आधीच उपलब्ध आहे. आता तिचं 'मिस्ट्रीज गॅलोर' हे चौथं पुस्तक नुकतच लाँच झालं.
हार्वर्ड विद्यापीठातून कोर्स पूर्ण केला : अमाना बेंगळुरूच्या बिशप कॉटन गर्ल्स स्कूलमध्ये १० वीत शिकत असून तिनं हार्वर्ड विद्यापीठातून 'मास्टरपीस ऑफ वर्ल्ड लिटरेचर' हा कोर्स केला आहे. शैक्षणिक अभ्यासासोबतच ती साहित्यिक कार्याशीही जोडलेली आहे. आई-वडिलांच्या पाठिंब्यानं अमानाची साहित्यिक कारकीर्द प्रगतीपथावर आहे. माजी लोकायुक्त न्यायमूर्ती एन संतोष हेगडे यांनी अमाना जे कुमार हिच्या चौथ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं.
अमानाला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार :
- भारतातील सर्वात तरुण कवी - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स - २०२१
- लहान वयात कविता लिहिल्याबद्दल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स - २०२१
- कौटिल्य कनिष्ठ कवी पुरस्कार - २०२१
- नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात तरुण कवयित्री म्हणून नोंद
- गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड - २०२२
- सर्वात तरुण कवी - वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स
- यंगेस्ट पोएट - इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स
हे वाचलंत का :